मुंबई -गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर ट्रक उलटला; केबिनमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू

0
930
बातम्या शेअर करा


खेड – मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर रासायनिक गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. नबी सरवर असे या अपघातात मृत पावलेल्या चालकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोटे औद्योगिक वसाहतीतून रासायनिक गाळ घेऊन मुंबईकडे जाणारा हा ट्रक भोस्ते घाट उतरत असताना अवघड वळणावर चालक नबी सरवर याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकून पडलेला चालक मदतीसाठी टाहो फोडत होता मात्र घटनास्थळी मदतपथक पोहचण्यास उशीर झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.
अपघाताची खबर मिळताच कशेडी येथील महामार्ग पोलीस टॅप चे पोलीस उपनिकरक्षक अनिल चांदणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याच दरम्यान खेड येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, तसेच रेस्क्यू टीमचे बुऱ्हाण टांके हे देखील आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाचा मृत्यदेह बाहेर काढणे शक्य नसल्याने अखेर क्रेन मागविण्यात आली. क्रेन आल्यावर क्रेनच्या सहाय्याने केबिनमध्ये अडकून पडलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या अपघातामुळे महामार्गावरील एकाबाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती.
भोस्ते घाटातील हे अवघड वळणावर आतपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. चौपदरीकरणादरम्यान वळणाचे काम योग्य प्रकारे न झाल्याने या ठिकाणी वारंवार जीवघेणे आपघात होत आहेत. या वळणावर अपघात होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपायोजना करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. मात्र संबंधित ठेकेदार आणि महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने आणखी किती बळी घेतल्यावर दखल घेतली जाणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here