एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन ; कोल्हापूर ,बेळगाव जिल्ह्याचा होणार विशेष सन्मान

0
105
बातम्या शेअर करा

मुंबई – मागील दोन वर्षांपासून कोरोनाविरूद्ध लढाईत काम करणे अवघड ! तरीही अनेक प्रकारे आक्रमण होत असतानाही आपले सहकारी पत्रकारांना मदत, सोबत सामाजिक भान ठेवून लोकांना मदत करण्याचे काम एनयुजे महाराष्ट्रच्या राज्यभरातील सहकाऱ्यांनी केले.

त्यातही सर्वोत्कृष्ट काम जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष सामंत, जिल्हासचिव शेखर धोंगडे, विनयकुमार पाटील, भुपेश कुंभार, आदींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने केले! आणि म्हणूनच सर्वोत्कृष्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा 24 डिसेंबर रोजी मुंबईतील एनयुजेमहाराष्ट्र च्या राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष सन्मान होणार आहे! सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी भाषा व बंधुभगिनीचा आवाज बुलंद करण्याचे काम बेळगाव सीमाभागातील एनयुजे महाराष्ट्रचे बेळगाव जिल्हा सहकारी करत आहेत! बेळगाव सीमाभागात जे दबावतंत्र मराठी भाषा, संस्थाबाबत कर्नाटक सरकार वापरते आहे, ते निंदनीय आहे! अशा कठीण परिस्थितीत तिथे जे पत्रकार काम करतात त्यांचे अभिनंदन करायला हवेच! एनयुजे महाराष्ट्र चे बेळगाव जिल्ह्यातील पत्रकार जिल्हाध्यक्ष श्रीकांत काकतीकर व विश्वनाथ येल्लुळकर, जितेंद्र पाटील, मिलिंद देसाई यांचे नेतृत्वात काम करीत आहेत ते विशेष अभिमानास्पद आहे आणि म्हणूनच एनयुजे महाराष्ट्र बेळगाव जिल्ह्याचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती सरचिटणीस सीमा भोईर यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उदघाटन आदरणीय खा शरद पवारजी यांच्या, अध्यक्ष दै सामनाचे कार्यकारी संपादक खा संजय राऊत, विशेष अतिथी माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर, स्वागताध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, झी 24 तास मराठीचे मुख्य संपादक निलेश खरे आदिच्या सन्माननीय उपस्थितीत होणार आहे! या गौरव सोहळ्यास डॉ नीलम गोऱ्हे उपसभापती, विधानपरिषद महाराष्ट्र यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, उच्च तंत्र मंत्री ना. उदय सामंत, शालेय शिक्षण ना.प्रा वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, खासदार राहुल शेवाळे, मृदा व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून तर सन्माननीय अतिथी म्हणून महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार भास्कर जाधव,अभिनेते विजय पाटकर, नागेश भोसले, विजय कदम, सुशांत शेलार, जयवंत वाडकर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर आदिची महत्वपूर्ण उपस्थिती असणार आहे. अशी माहिती एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली. तसेच हा संपूर्ण सोहळा कोरोना आपात्कालीन निर्बंध पालन करून आयोजित करण्यात येणार आहे असे एनयुजे महाराष्ट्र संघटन सचिव कैलास उदमले यांनी सांगितले प्रवक्ता संदीप टक्के यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here