गुहागर – गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपात उतरले एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे याच वेळी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने आणि राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी आज गुहागर आगारात एसटी कर्मचारी यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. रक्तदान करून अशा प्रकारे आगळ्यावेगळ्या शासनाचा निषेध करणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर एक नावाजलेल एसटी आगार या आजारातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सर्वत्र धावत असतात आणि जिल्ह्यात ज्यावेळी एसटी महामंडळाचे एखादं काम असतं त्यावेळेला याच आगारातील कर्मचारी उत्कृष्ट काम करून या आगराचे काम कसे चांगले होईल यासाठी प्रयत्न करतात. गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आणि याच संपात गुहागर आगारातील कर्मचारी उतरले मात्र गेले दोन ते तीन दिवस गुहागर आगारात येऊन शासनाचा निषेध करत नुसतच बसण्यापेक्षा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आणि शासनाचा निषेध एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यासाठी आज गुहागर आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आगळावेगळा निषेध करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत एसटीचे कर्मचारी रक्तदान करणार आहेत.त्यामध्ये येथील एसटीचे चालक-वाहक मेकॅनिकल आणि इतर सर्व कर्मचारी एकत्र येत कोव्हीडच्या नियमांचे पालन करत याठिकाणी रक्तदान करणार आहेत. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या निषेधाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा संपाची दखल योग्य वेळी घेतली नाही तर आंदोलन याहीपेक्षा अधिक कडक करणार असल्याचे एसटी कर्मचारी सुभाष पावसकर यांनी सांगितले.