खेड- राज्य शासनाच्या अंतर्गत येणा-या रत्नागिरी जिल्हा हिवताप कार्यालयामधे 2016/17 मधील आरोग्य सेवक भरती मधे बोगस प्रमाणपत्राव्दारे नोकरी मिळवली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याची आरोग्य विभागाने चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य हिवताप हंगामी कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष ईकबाल चौघुले यांनी केली आहे.
आरोग्य विभागाने 2016/17 मधे आरोग्य विभागात मोठया प्रमाणात आरोग्य सेवक भरती केली होती. शासनाने आरोग्य सेवक भरती मधे एकूण जागेच्या 50% जागा ह्या हिवताप हंगामी फवारणी कर्मचारी यांचेसाठी राखीव ठेवल्या आहेत. यातून फक्त हंगामी फवारणी कर्मचा-याना नोकरीत सामावून घेतले जाते. माञ याचा फायदा परजिल्ह्यातील काही बोगस प्रमाणपत्रधारकांनी घेतला असून लाखो रूपये देऊन बोगस प्रमाणपत्र आपआपल्या जिल्हयातून घेतली आहेत. अशा बोगस प्रमाणपत्राव्दारे रत्नागिरी जिल्हा हिवताप कार्यालयामधे नोकरी मिळवली असल्याचे खात्री लायक वृत्त आहे. याबाबत आपण माहीतीच्या अधिकाराखाली माहीती मागवली असून संबधिताची चौकशी करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी आरोग्य संचालक, सहसंचालक पुणे व विभागीय सहसंचालक कोल्हापूर यांचे कडे करणार आहे. संपुर्ण राज्यातील बोगस प्रमाणपत्र वाल्यांचे रॅकेटचा आपण पर्दापाश केला असून यातूनच रत्नागिरी जिल्हा हिवताप कार्यालयातील बोगस प्रमाणपत्राव्दारे नोकरी मिळविणारांची माहीती समोर आली आहे. संबंधित उमेदवारांमुळे स्थानीक फवारणी कर्मचारी शासकीय नोकरी पासून वंचित राहिले आहेत. या उमेदवारांमुळेच चालू असलेल्या भरती प्रक्रीयेमधे देखील मोठया प्रमाणावर परजिल्हयातील उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले आहेत त्यांचा आपण करेक्ट कार्यक्रम केला असून 2016/17 मधे आरोग्य सेवक म्हणून बोगस प्रमाणपत्राव्दारे नोकरीस लागलेल्यांचा देखील करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे ईकबाल चौघुले यांनी म्हटले आहे.