खेड – खेड पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई -गोवा महामार्ग वरील रिलायन्स पेट्रोलपंप परीसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्री साठी घेऊन आलेल्या एकाला सापळा रचून रंगेहाथ पकडून त्याच्या कडून ८ किलो वजनाचा गांजा व कार असा तब्बल ४ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी महाबळेश्वर जि. सातारा येथुन आलेला आरोपी रियाज हशम तांबोळी महाबळेश्वर जि. सातारा यांच्यावर धाड टाकून त्याला १, लाख २६ हजार रुपये किंमतीचा ८ किलो ४१० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ पकडले. संशयित याचेकडुन गांजा हा अंमली पदार्थ, चारचाकी वाहन, मोबाईल फोन असे साहित्य असा एकूण ४,लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.