कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘मँगो स्पेशल ट्रेन’

0
90
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोकणातील हापूस बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेऊ केला आहे. आता उत्पादकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे. कोकण रेल्वे महामंडळाने ‘मँगो स्पेशल ट्रेन’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधील हापुस आंब्याला मोठी बाजारपेठ मिळण्यासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड स्पेशल मँगो ट्रेन सोडण्याच्या तयारीत आहे. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून येथील बागायतदारांना मुंबई, गुजरात सारखी बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन त्या ठिकाणी मोठा नफा देण्याचा कल आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ, वेंगुर्ला पासून रत्नागिरीतील बागायतदारांची बैठक होणार आहे. संबधित व्यावसायिक आणि बागायदारांशी दोन दिवसात चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कोकणातील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते; परंतू आंबा हा नाशवंत असल्यामुळे तो वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र वाहतूकीची योग्य ती सोय आणि स्वस्त सेवा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होतो. त्याची झळ बागायतदाराला सोसावी लागते. हे लक्षात आल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मँगो स्पेशल ट्रेन सोडुन येथील आंबा मुंबई व गुजरात सारख्या मोठ्या बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. हा आंबा प्रवासात टिकावा यासाठी आवश्यक असलेली सोय या ट्रेन मध्ये करण्यात येणार आहे. यासाठी नेमके किती बागायतदार पुढे येतात त्यांचे काम म्हणणे किंवा मागण्या आहेत. याबाबत मते जाणून घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here