अन तहसीलदार स्वतः झाल्या भातकापणीत व्यस्त

0
711
बातम्या शेअर करा


गुहागर – शासनाच्या विविध योजना शेतकरी वर्गासाठी येत असतात आणि या योजना अधिक प्रभावीपणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून राबवून घेण्याचे काम तेथील अधिकारी वर्ग करत असतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी वर्गाला प्रोत्साहित करणारे अधिकारी वर्ग फार कमी प्रमाणात पहावयास मिळतात. गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी नेहमीच शासकीय योजना राबवताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ती योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे.

शासनस्तरावरून विविध शासकीय योजना शेतकरी वर्गासाठी येत असतात. मात्र अनेक वेळा शेतकरी वर्गाला त्या योजनांचे महत्व योग्य पध्दतीने पटवून दिले जात नसल्याने त्या कागदावरच राहतात. मात्र याला अपवाद ठरवत गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी इ-पीक पाहणी तसेच पीक कापणीचा प्रयोग प्रत्यक्ष शेतात जाऊन स्वतः शेतकऱ्यांसोबत पीक कापणी करून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
नुकतेच पालशेत येथील शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी स्वतः भातकापणी व झोडणीचा अनुभव घेतला. यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गाचे आता संपूर्ण तालुक्यातुन कौतुक होत आहे. अनेक वेळा कार्यालयीन कामाच्या चौकटीबाहेर अधिकारी वर्ग कधीच पडताना दिसत नाही. मात्र काही अधिकारी हे याला अपवाद असतात. केवळ कागदावर योजना न राबवता ती प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोचवत ती यशस्वी करण्याचे काम करतात. गुहागर तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यादेखील या यातीलच एक आहेत. राजापूर तालुक्यात यशस्वी कामकाज पाहिल्यानंतर त्यांनी गुहागर येथे बदली झाल्यावर आपल्या लोकाभिमुख कामकाजाची प्रचिती करून दिली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here