गुहागर – सावधान तुमची गाडी चोरीला जात आहे. ? किंवा तुमची गाडी चोरीला गेली आहे. असं जर असेल तर तुमची ती गाडी मिळू शकते गुहागर तालुक्यातील भंगारवाल्याकडे होय…. सध्या तालुक्यात भंगारवाले मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गाड्या भंगारसाठी आल्याने या चोरीच्या असल्याची शक्यता बळकावली असून सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2021/09/IMG_20210920_072205-1024x588.jpg)
गुहागर तालुका तसा शांत याच तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे शृंगारतळी याठिकाणी सध्या अनेक भंगारवाले आपलं बस्तान मांडले आहे. याच भंगारवाले यांनी अनेकदा येथील स्थानिकांन सोबत सुद्धा वाद केले आहेत. स्थानिकांना न जुमानता हे परप्रांतीय भंगारवाले या ठिकाणी आपला व्यवसाय बेधड आणि बिनधास्तपणे करतात मात्र गेल्या सहा महिन्यापासून शुंगारतळी परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या महिन्यात एका पत्रकाराची गाडी चोरीला गेली त्या वेळी अधिक माहिती घेतली असता ती दुचाकी गाडी भंगारवाल्याकडे मिळाली. याबाबत पाहणी करण्यासाठी गेलो असता या ठिकाणी दुचाकी मोठ्या प्रमाणात तोडण्यासाठी येतात किंवा भंगार मध्ये आणल्या जातात याची माहिती मिळाली.त्यानंतर आम्ही अनेक भंगारवाल्याकडे प्रत्यक्ष पाहणी केल्यावर असे लक्षात आले की हे परप्रांतीय भंगारवाले अनेक गाड्या तोडताना दिसले याबाबत आम्ही त्यांच्याकडे विचारणा केली असता आम्हाला पोलिसांचा पाठिंबा आहे……… आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. तुम्हाला जे काय करायचे ते करा असे उर्मट उत्तर हे भंगारवाले देतात त्यामुळे जर आपली गाडी चोरीला गेली असेल तर त्वरित शृंगारतळी तील भंगारवाल्याकडे जाऊन पाहणी करा त्या ठिकाणी आपली गाडी मिळेल हे मात्र नक्की…. गुहागर तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी किंवा भंगारवाले चोरलेला गाड्या घेतात हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्वरित या ठिकाणची पाहणी करावी आणि आणि त्या भंगारवाल्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे.
नारायण -नारायण- नारायण माझ्याकडे अनेक गाड्या आहेत मी त्या गाड्या तोडतो याबाबत मला स्थानिक लोकप्रतिनिधी मदत करतो…. तुम्हाला काय विचारायचे ते पोलिस स्टेशनमध्ये जाऊन विचारा……. कारण मी त्यांना हप्ता देतो नारायण –नारायण