VIDEO चिपळूण ; पुराच्या पाण्यात धाडसी कामगिरी करणारा पोलीस बिल्ला नंबर 1262…..

0
329
बातम्या शेअर करा

चिपळूण -(लक्ष्मीकांत घोणसेपाटील ) -सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं वाक्य खांद्यावर घेऊन जो मदत करतो. जो नेहमी मदतीला धावतो अशी ही खाकीवर्दी याच खाकीवर्दी अनेक जण आपल्याला अनेक ठिकाणी मदत करताना दिसतात. तसाच खाकीतील एक जवान विश्वनाथ शिंदे बिल्ला नंबर 1262 हा आपला जीव धोक्यात घालून 20 फूट पाण्यात पाण्याला वेग असताना पोहत जाऊन तब्बल तीन जणांना वाचवण्यात त्याला यश आले. वरिष्ठांच्या आदेशाने आणि सर्वांच्या प्रेमाने आपण धाडस करून या तिघांना वाचवले असे तो सांगतोय.

चिपळूणमधील महापुरा मध्ये अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. याच वेळी बस स्टँड ,मच्छीमार्केट ,खेर्डी या परिसरात जवळपास 20 ते 17 फूट पाणी होतं तर काही सखल भागांमध्ये तब्बल वीस फुटांपेक्षा जास्त पाणी होत. या वेळेला अनेक ठिकाणावरून पोलिस यंत्रणेला महसूल यंत्रणेला आम्हाला वाचवा म्हणून फोन येत होते. याच वेळी रत्नागिरी पोलिसांची रेस्क्यू करण्याची बोट उपलब्ध झाली असता चिपळूण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी या वरिष्ठांच्या आदेशाने दोन बंगाली नावाडे यांना घेऊन चिपळूण पोलीस स्टेशनचा विश्वनाथ शिंदे हा हेड कॉन्स्टेबल चिपळूण मधील मधील अनेक पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी पुढे आला. यावेळी त्यांनी खेर्डी ,एसटी स्टँड या परिसरातील अनेक लोकांना वाचवले मात्र खरी कसरत लागली ती चिंचनाका येथे चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिंचनाका मध्ये जवळपास वीस फुटांपेक्षा जास्त पाणी होते. आणि पाण्याचा प्रवाह होता त्यांनी घेतलेली बोट ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे अनेक वेळा मार्ग बदलत होती. मात्र याच वेळी प्रसंगावधान राखून त्या तिघांना वाचवायचे तिघांना सुरक्षित ठेवायचे हे उद्दिष्ट ठेवून विश्वनाथ आपल्या दोन सहकार्‍यांसोबत त्या मार्गावर गेला त्याच वेळी बोटीचा प्रवास बदलत आहे असे पाहताच तात्काळ पाण्यात उडी मारून त्यांनी आपली बोट एका विद्युत खांबाला बांधली आणि पोहत जाऊन चिंचनाका येथील एका हॉटेलच्या पत्र्यावर उभ्या असणाऱ्या तीन जणांना लाईफ जॅकेट्स बोटीत घेण्यात त्यांना यश आले अखेर त्या पाण्याचा प्रवाहातून बोट कशी तरी बाजूला काढून सुरक्षित अशा उंच ठिकाणावर असणार्या इमारतीत त्या तीन जणांना सोडून विश्वनाथ शिंदे पुन्हा माघारी परतले मात्र याच वेळी विश्वनाथ शिंदे यांनी जी खाकी वर्दीतील माणुसकी व धाडस दाखवले त्यामुळे विश्वनाथ शिंदे बिल्ला नंबर 1262 सध्या अनेकांच्या गळ्यातला बनला आहे. होय विश्वनाथ शिंदे म्हणजेच बिल्ला नंबर 1262 होय.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here