बातम्या शेअर करा

इंग्रजांच्या काळात सुरू झालेले टाईपरायटर अर्थात टंकलेखन यंत्र सध्याच्या डिजिटल युगात कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अनेक वर्षांपासून टंकलेखनाची परीक्षा घेतली जाते. शनिवारी  अनेक ठिकाणच्या केंद्रांवर अखेरची परीक्षा झाली

दहावी, बारावीनंतर अनेक विद्यार्थी टंकलेखनाचे प्रशिक्षण घेतात. इतर शिक्षणासह टंकलेखनाचे प्रमाणपत्र म्हणजे नोकरी मिळवण्यासाठीचे एक महत्त्वाचे प्रमाणपत्र मानले जात असे. हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नसणारे अनेक विद्यार्थी टंकलेखनाचे प्रशिक्षण घेऊन लिपिकपदावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असत; मात्र संगणकाच्या युगात टंकलेखन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. टंकलेखन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे सरकारने मॅन्युअल टायपिंग यंत्रे आणि संगणकाचा योग्य समन्वय साधून संगणक टायपिंग कोर्स अधिकृत टायपिंग संस्थांमध्ये लागू केला; परंतु संगणकीय यंत्रणांचा वाढता वापर पाहता टंकलेखन मागे पडू लागले. त्यातच सध्याचा डिजिटलचा वाढता प्रभाव टाईपरायटरची टकटक बंद करणारा ठरला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here