चिपळूण – मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम येथे रस्त्यावरील दरड कोसळून रस्त्यावर माती आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
चिपळूण तालुक्यातील परशुराम येथील घाटात सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे याच ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करताना दरड कोसळणे, रस्त्याशेजारी असणारी माती रस्त्यावर येणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने नियमित पावसाळ्यात या ठिकाणची वाहतूक ठप्प होताना दिसते. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असताना या घाटातील रस्ता रुंदीकरण केव्हा होणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2021/07/IMG-20210711-WA0060-1-576x1024.jpg)