गुहागर – गुहागर – विजापूर या महामार्गावर पाटपन्हाळे येथे ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा फाटका एस.टीची बस बसला आणि एसटी बस रस्त्यावरून कलंडली मात्र ती कडेला असलेल्या मातीत रुतल्याने मोठा अनर्थ टळला. हि घटना आज सकाळी घडली.
गुहागर -विजापूर या महामार्गवरील पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या समोर रस्त्याच्या मधोमध गड्गोबा नावाचे स्वयंभू व जागृत देवस्थान आहे. रस्त्याच्या कामात हे देवस्थान अबाधित ठेवण्यात आले. हे देवस्थान जागीच ठेवून दुतर्फा रस्ता काढण्यात आला. मात्र रस्त्याशेजारी इथे मोठ्या दरडी असून त्या पावसामध्ये घसरल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना अतिशय काळजीपूर्वक वाहने चालवावी लागतात. चिखलातून वाहने सरकत जातात . रविवारी सकाळी गुहागरकडून शृंगारतळीकडे जाणारी एस.टी ची बस गडगोबाच्या इथे आली व चिखलातून सरकत जावून रस्त्याच्या कडेला जावून बाजूच्या मातीत रुतली व एका बाजूस कलंडली. या गाडीमध्ये प्रवाशी बचावले व कोणतीही हानी झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी निश्वास सोडला.
गेल्या दोन वर्षापासून गुहागर- विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका अनेकदा येथील स्थानिकांना आणि वाहनचालकांना बसला ठेकेदारावर कोणाचाही अंकुश नसल्याने अशाप्रकारे बोगस काम केल्याचे पुरावे जागोजागी मिळत आहेत.