रामपूर – गुहागर – चिपळूण या महामार्गावरील घोणसरे येथील गायकरवाडी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करताना केलेला भराव व्यवस्थितपणे न टाकल्याने या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गुहागर-विजापूर या रस्ता रुंदीकरणाच्या कामात ठेकेदार अनेक ठिकाणी मनमानी करत असुन ज्या ठिकाणी निसर्गाने निर्मित पाण्याचे प्रवाह आहेत ते बुजवून रस्ता करत आहे त्याचा परिणाम म्हणून हे पाणी या पुलावरून गेल्याचे येथील नागरिक सांगतात जवळपास दोन तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्ववत झाली.