गुहागर – गुहागर शहरातील ओंकार विजय गुरव याचा शिवसेना युवासेना गुहागर शहर तर्फे सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरीच्या स्पर्धेत ओंकारने बाज़ी मारली. ओंकारने निबंध स्पर्धेत प्रथम तसेच कविता लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तसचे मदर्स डे निमित्त स्टोरी मिरर या ऑनलाइन पोर्टलवर झालेल्या जागतिक स्पर्धेत २००० स्पर्धाकांमधुन ओंकार १४ व्या नंबर वर निवडण्यात आला. यामुळे सर्व माध्यमातुन त्याचे कौतुक होत आहे. गुहागर शहरातर्फे ओंकार व त्याच्या आई-बाबांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विनायक जाधव, युवासेना तालुका प्रमुख श्री. अमरदिप परचुरे, युवासेना शहर प्रमुख श्री.राकेश साखरकर, शाखाप्रमुख कल्पेश बागकर, राज विखारे, अविनाश सांडीम, अभिषेक कदम, प्रसाद गुरव, आशिष कदम, सुधांशू गुरव आणि विनोद कदम उपस्थित होते.