चिपळूण – करोडो रुपये खर्च करून गेलेल्या तयार केलेल्या नळपाणी योजनेला गेल्या दोन दिवसांपासून पाणी येत नसल्याने करोडो रुपयांची नळपाणी योजना फेल गेली असल्याचा आरोप दोणवली गावचे नंदकुमार कदम यांनी केला आहे.
चिपळूण तालुक्यातील दोणवली येथील नळपाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा या गावातील अनेक ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी ,पाणीपुरवठा विभाग ,मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत. मात्र करोडो रुपये खर्च करूनही पाणी योजना कधीच सुरळीत चालू नसते असा आरोप नंदकुमार कदम यांनी केला आहे.सध्या कोकणात पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा वेळेला विहिरीमध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा विहिरीवर पाणी योजनेचे दोन पंप सेट असतानासुद्धा गेले दोन दिवस झाले गावात पिण्याचे पाणी नळाला येत नसल्याचे तक्रार त्यांनी केली आहे. जर करोडो रुपये खर्चून पाणी योजना व्यवस्थित चालत नसेल या नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ही नळ पाणी ताब्यात घेणाऱ्या ग्रामपंचायत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ही पण बातमी पहा https://pragatitimes.in/?p=234