गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हापरिषद गटाच्यावतीने उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व आशासेविका व आरोग्य कर्मचारी यांचा कोवीड योध्दा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वेळणेश्वर गटाच्या जिल्हापरिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी आपल्या गटात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून येथील सर्वसामान्यांना मोठा आधार दिला आहे. त्या धडाडीच्या कार्यकर्त्या असून त्यांना जनाधारही मोठा लाभला आहे. नवनवीन उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतंर्गत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी कोवीड आपत्तीत घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी, लसीकरण केले. त्यांचे हे योगदान मोलाचे असल्याने त्यांचा सन्मान करावा, अशी इच्छा मनी बाळगून गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. नेत्रा ठाकूर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पूर्वी निमूणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, माजी सभापती सौ. पूनम पाष्टे, विलास वाघे, आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डाँ. अतुल गावड, शीर सरपंच विजय धोपट, शैलेश साळवी, पिंपर सरपंच पूर्वी मोरे, कोतळूक सरपंच उर्मिला गोरिवले, शिवसेना विभागप्रमुख अंकुश शिगवण, अमित साळवी, संदेश भाटकर, सर्व आशासेविका, आरोग्यसेवक आदी उपस्थित होते.
















