गुहागर पोलिसांची दमदार कामगिरी, पुन्हा चोरी करण्यासाठी आलेल्या त्या चोरांना पकडले

0
861
बातम्या शेअर करा

गुहागर – ते पुन्हा चोरी करण्यासाठी आले आणि त्याच वेळी गुहागरच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले गुहागर पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

गुहागर तालुक्यातील रानवी येथे काही दिवसापूर्वी इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी जे पोलं वापरण्यात येतात ते 8 लाख 54 हजार रुपये किमतीचे 155 पोल
चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करताना हे चोर पुन्हा कोकणात चोरी करण्यासाठी आले आहेत हे गुहागर पोलिसांना तपास करताना लक्षात आले. त्याच वेळी गुहागर पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना चोरी करण्यासाठी आले असता संगमेश्वर तालुक्यातील एका ठिकाणी पकडले पोलिसांच्या या जाबाज कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी रानवी येथील हिंदुस्थान रीसॉर्ट मधुन इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी वापरण्यात येणारे पोल् चोरीला गेले होते या चोरीचा तपास करताना गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम व त्यांच्या टीमला हे चोर पुन्हा चोरी करण्यासाठी येत असल्याची तपासादरम्यान मिळाली त्याच वेळी गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कदम व यांच्या सहकार्याने त्याच रात्री संगमेश्वर येथे जाऊन त्यात चार चोरांना पकडण्यात यश आले यावेळी गुहागर पोलिस स्टेशन मधील राजू कांबळे,वैभव चौगले, संतोष साळकर, संतोष माने, विद्याधर नारकर,स्वप्निल शिवलकर,शैलेश वणगे,प्रथमेश कदम,सचिन पाटील,वैभव ओहोळ प्रतीक रहाटे, विजय चव्हाण हे कर्मचारी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here