रत्नागिरी ; तिसऱ्या लाटेपूर्वीच जिल्ह्यात ३ हजार मुले कोरोना बाधित

0
444
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त मुले बाधित होण्याची शक्यता आरोग्य विभागने वर्तविली आहे. मात्र जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतच सुमारे ३ हजार मुले कोरोना बाधित झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील मुलांची प्रतिकार क्षमता चांगली असल्याने त्यांनी या महामारीवर यशस्वी मात केली. मात्र एका १० वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला. तर समाधानाची बाब म्हणजे ३ चिमुकल्यांनी डेल्टा व्हेरिएंटवर या कोरोमानाच्या नव्या स्ट्रेनवर मात केली आहे. लहान मुलांना सकस आहार देऊन विशेष काळजी घेतल्याने हे शक्य झाले आहे, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी व्यक्त केला. पालकांनी यापुढे मुलांबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील बालके कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात २ हजार ९०८ मुलांना कोरोनाची बाधीत झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये ० ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश होती. समाधानकारक बाब म्हणजे मुलांमध्ये चांगली प्रतिकारक्षमता असल्याने सर्व मुलानी कोरोनावर मात केली आहे. जून महिन्यात ७० ते ८० मुलो कोरोना बाधित होती. या मुलांमध्ये सर्दी, ताप, अशी लक्षणे आढळून आली. मात्र घाबरण्याची आवश्यकता नाही. पालकांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.
संगमेश्वर तालुक्यातील डेल्टा व्हेरिएंटचे ९ रुग्ण आढळून आले होते. उपचारानंतर हे ९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या तीन बालकांचा यामध्ये समावेश होता. ३ वर्षे, ४ वर्षे आणि ६ वर्षांच्या बालकांना डेल्टा व्हेरिएंट कन्सर्न होता. मात्र त्यांनी त्यावरही मात केली आहे. लहान मुलांमध्ये डेल्टा व्हेरिएन्ट आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे. मात्र पालकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here