त्या तीन लहान मुलांनी केली डेल्टा प्लस वेरियंटवर मात .

0
256
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटने धोका निर्माण झाला आहे. त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळूले होते. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते.आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू देखील रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता या वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डेल्टा प्लस वेरियंटवर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील तीन मुलांनी डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात केली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये तीन लहान मुलांना डेल्टा प्लस या विषाणूची बाधा झाली होती. त्यामध्ये एक तीन वर्षाचा, चार वर्षाचा व सहा वर्षाच्या लहानग्यांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. आता मात्र या तीनही लहान मुलांनी कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात केलीय. त्यामुळे डेटा प्लस मुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here