चिपळूण ; सावकारांकडून होत असलेल्या पठाणी वसुली विरोधात महिला व नागरिक एकवटले

0
226
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण शहरात बेकायदा सावकारी धंदे सुरू असून या सावकारांकडून होत असलेल्या पठाणी वसुली व भरमसाठ व्याज आकारणी संदर्भात चिपळुणातील महिला नागरिक एकवटले असून या सर्वांनी शनिवारी लोकप्रतिनिधींसह पोलिसांना निवेदन दिले असून बेकायदा सावकारां विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात दोन सावकारांसह एका तरुणीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून पोलीस या तिघांवर कोणती कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गोवळकोट येथील महम्मद अब्दुल रेहमान पटेल यांनी सदरील निवेदन दिले आहे.

या निवेदनानुसार चिपळूण शहरात गेल्या ८ ते १० वर्षांपासून सावकारी धंदा कोणालाही न जुमानता सुरू आहे. नियमानुसार व्याज आकारणी न करता सुमारे १५ टक्के व्याज आकारणी केली जात आहे. या सावकारी रॅकेटमध्ये दोन खंडजोडे नामक व्यक्ती तसेच एक तरुणी असे काही १५ लोक चिपळूण शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी ठेवून सावकारी धंदा करीत आहेत. लोकांच्या गरजेला पटकन पैसे द्यायचे. परंतु त्याची पठाणी वसुली करत दुप्पट-तिप्पट वसूल करायचे. वेळप्रसंगी धमक्या देणे. कर्जदारांच्या घरातील वस्तू उचलून आणणे वाहने. जप्त करणे. कर्जदार महिलेला वसुलीच्या वेळी असभ्य भाषा वापरणे, असे प्रकार या सावकारांकडून होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सावकारी धंदा करणारे लोक महिलांशी असभ्य भाषा वापरतात. दिनांक २३ जून रोजी गोवळकोट येथील ५ महिलांशी असभ्य भाषा वापरण्याचा प्रकार घडला. याबाबत आम्ही सावकारी धंदा करणाऱ्या लोकांना फोन केला. मात्र त्यांची भाषा यावेळी देखील तर असभ्य होती. तर उलट ते म्हणाले की, आमचे कोणी वाकडे करू शकत नाही. एकंदरीत सावकार लोक बेफाम झाले आहेत. यातूनच वडनाका येथील अभिजीत गुरव या उमद्या तरुणाने आत्महत्या केली असावी. यामुळे या प्रकरणाची देखील सखोल चौकशी होऊन संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावी निवेदनकर्ते महम्मद पटेल, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, अमीन परकार, सिराज चौगुले, डॉ. शमीना परकार, नाजिम अफवारे, फैयाज भाटकर आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here