तिवरे धरण फुटीचे अहवाल कुठे नेमके अडकले ?..

0
172
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील तिवरे भेंदवाडी येथील धरण फुटीला दोन वर्षे पूर्ण होत आली. तरी याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. या दुर्घटनेनंतर शासनाने स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथक व पुनर्विलोकन समितीचे अहवाल अद्यापही गुलदस्त्यात का आहेत? तिवरे धरणफुटीप्रकरणी संबंधित जबाबदार लोकांवर कारवाई का होत नाही ? असा सवाल चिपळूणवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे भेंदवाडी येथील धरण २ जुलै २०१९ रोजी फुटल्याने मोठी जीवित व वित्तहानी झाली. यामध्ये २२ ग्रामस्थांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेत ६ जुलै २०१९ रोजीच्या आदेशानव्ये या जीवित व वित्त हानी प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमले. या पथकात पथक प्रमुख अविनाश सुर्वे (सचिव जलसंपदा तथा कार्यकारी संचालक विदर्भ सिंचन विकास महामंडळ नागपूर ), सदस्य- मुख्य अभियंता (लघुसिंचन )जलसंधारण, जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचा समावेश करण्यात आला. तर या पथकाने तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे व त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे. लघु सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, माल गुजारी तलाव व इतर तत्सम बाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरता उपाय सुचवणे. या पथकाने आपला अहवाल दोन महिन्याच्या आत शासनास सादर करावा असे या आदेशानव्ये स्पष्ट करण्यात आले होते.

यानुसार या विशेष पथकाने आपला अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली. या समितीला आणखी दोन महिन्यांची म्हणजेच २० फेब्रुवारी २०२१ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या पुनर्विलोकन समितीच्या अहवालाचे पुढे काय झाले ? हे अजूनही कळले नाही. एकंदरीत तिवरे धरणफुटी प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई न झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच तिवरे धरणग्रस्तांचे अद्यापही काही प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे या तिवरे धरणग्रस्तांचा सह मृत ग्रामस्थांना न्याय मिळणार की नाही ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे या घटनेनंतर विशेष चौकशी पथक नेमण्यात आले होते या पथकाने शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर या अहवालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी पुनर्विलोकन समिती तयार करण्यात आली होती या समितीला दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here