वनपाल अनिल दळवी यांना आमदार योगेश कदम यांचा सुखद धक्का

0
336
बातम्या शेअर करा

खेड -शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे नेहमीच आपापल्या विभागात जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार मोहोदयाना नेहमीच घाबरून असतात. जनहितार्थ कामांची शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पूर्तता करण्यासाठी आमदारांना शासकीय यंत्रणेवर असा वचक ठेवावाच लागतो. परंतु हेच आमदार कधी कधी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देखील देतात आणि आपण आपल्या कर्तव्याशी ठाम असलो तरी आपल्यालाही माणुसकी आहे याचे दर्शन घडवून आणतात. असाच एक सुखद धक्का दापोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी वन विभागातील मंडणगड तालुक्याचे वनपाल अनिल दळवी यांना दिला आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली मतदार संघातील खेड, दापोली आणि मंडणगड या तीन तालुक्यात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. आता आमदार महोदयांच्या उपस्थितीतील कार्यक्रमासाठी वन विभागाचे तिन्ही तालुक्यातील वनपाल हे आपल्या संपूर्ण टीमसह उपस्थित होते. सकाळपासून आमदारांच्या प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमात हिरीरीने काम करणारे मंडणगड तालुक्याचे वनपाल अनिल दळवी यांचाही आज वाढदिवस आहे हे समजल्यावर आमदार योगेश कदम यांनी अनिल दळवी यांचा सत्कार केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. स्वतः आमदारांनी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही बाब दळवी यांच्या मनाला सुखावून गेली. यावेळी दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्याचे रेंज ऑफिसर बोराटे हे देखील उपस्थित होते. आढावा बैठकीत नेहमी शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांच्याकडून जनतेची कामे करून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेवर धाक ठेवणारे आमदार जेंव्हा आशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांचा गौरव करतात तेंव्हा निश्चितच शासकीय यंत्रनेलाही असा माणुसकी असलेला आमदार लाभल्याचे खऱ्या अर्थाने समाधान मिळते. आमदार योगेश कदम यांनी कार्यपद्धती ही इतर लोकप्रतिनिधींपेक्षा निश्चित स्वरूपाने वेगळी आहे आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने जनतेचे लोकप्रिय आमदार आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here