आजपासून 24 कॅरेट सोनं इतिहासजमा होणार!

0
228
बातम्या शेअर करा

सोने खरेदी ही अनेकांसाठी गुंतवणुकीची पद्धत असते. सोने खरेदी करण्यासाठी जाताना आता ग्राहक आणि विक्रेत्यांना एक नियम काटेकोर पाळावा लागणार आहे. सोन्याला हॉलमार्किंग असेल असेच सोने आता विकता आणि खरेदी करता येणार आहे. हॉलमार्किंग म्हणजे काय आणि नवे नियम काय आहेत जाणून घ्या:

काय असतं हॉलमार्क?

▪️ हॉलमार्क हे सोने, चांदी आणि प्लॅनिटमच्या शुद्धतेचे प्रमाण आहे. हे सोने किंवा प्लॅटिनम विश्वसनीय असल्याचे निश्चित करण्याचे माध्यम आहे. हॉलमार्कची ही प्रक्रिया पूर्ण देशात भारताच्या ब्यूरोमार्फत म्हणजे BIS मार्फत होणार आहे.

भारतात हॉलमार्किंगशी जोडलेले नवे नियम

▪️ आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तरच त्यांची विक्री करता येईल.

▪️ अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

▪️ त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here