मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरूच असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे. तथापि, नाशिक, नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे. एकीकडे मुंबई, पुणे या शहरी भागातील रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे.