रत्नागिरी – -रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याबाबतच्या उपाययोजनांसाठी सर्वपक्षीय बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दिवसात नव्याने राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.तसेच मुंबईतून येणाऱ्यांना चौदा दिवस क्वॉरंटाईन करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जिल्ह्यात 13 नव्या अॅम्ब्युलन्स लवकरच दाखल होतील. त्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यातील 10 अॅम्ब्युलन्स या जिल्हा परिषदेकडे एक वर्ग केल्या जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयासाठी दिली जाणार आहे. दोन कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स असून त्यातील एक रत्नागिरीसाठी एक चिपळूणसाठी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही ना सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात येणाऱ्यांची टेस्ट केली जात आहे. त्याचप्रमाणे मुंबई व अन्य ठिकाणाहून येणाऱ्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन केले जाणार आहे. या सर्वांसह गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्यांच्या हातावर शिक्का मारला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.