चिपळूण- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे.चिपळूण शहरात देखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.आजूबाजूचे शासकीय आणि खाजगी कोविड सेंटर फुल झाले आहेत.आशा परिस्थितीत चिपळूण नगरपालिकेने चिपळूण शहरात स्वतःचे कोविड केअर सेंटर उभारावे.त्यासाठी गरज लागल्यास ५८/२ कलमाचा वापर करून निधीची तरतूद करावी.सामाजिक संस्थांना विश्वासात घ्यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष विद्यमान विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे.दररोज दुपटीने वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिपळूण शहरात सामूहिक संसर्गाची भीती आहे.दुर्दैवाने सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्याची श्यक्यता आहे.त्यामुळे आता पासूनच तयारी करणे आवश्यक असल्याचे बाळा कदम यांनी म्हटले आहे.
चिपळूण नगरपालिकेकडे स्वतःची आरोग्य यंत्रणा आहे.तसेच नगरपालिका मालकीच्या इमारती आणि जागा देखील आहेत.त्यामुळे पुढील धोका ओळखून पालिकेने स्वतःचे प्रयत्न करावे असे कदम म्हणाले.
 
             
		
