चिपळून- नगरपालिकेकडे कोव्हीडचा 35 लाखाचा निधी पडून आहे मात्र अजूनही चिपळूण नगरपालिकेने कोविल संदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या 35 लाखांमध्ये पालिकेने मुख्याधिकारी यांनी त्वरीत कोव्हीड सेंटर सुरू करावे व ॲम्बुलन्स घ्यावी अशा स्पष्ट सूचना आज येथे झालेल्या बैठकीत तसेच पत्रकार परिषदेत माहिती देताना ना.उदय सामंत सांगितले.
आज येथील डीबीजे कॉलेजमध्ये तंत्र व शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची होईल उपायोजना संदर्भात आढावा बैठक होती या बैठकीला तहसीलदार वैद्यकीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी व्हिडिओ डी वाय एस पी व अनेक अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उदय सामंत यांनी तालुक्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला याच वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चिपळूणमध्ये जवळील कामथे उपरुग्णालयात आणखी तीस बेड वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेततसेच व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली तसेच व्हॅक्सीनमध्ये सुसत्रता आणण्याची बाबही सामंत यांनी मान्य केली. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये म्हणून कामथे उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट उभारण्याचे काम ही सुरू करण्यात येईल असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे सांगतानाच जर असे कोणी आढळूण आले तर त्यांची वाहने जप्त करण्यात येतील व तशा सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत याशी याशिवाय जे पॉझिटिव्ह रुग्ण व विलगीकरणा जे आहेत त्यांना शिक्के मारण्याचे काम त्वरित सुरू करण्यात येते असेही सांगण्यात आले पेढांबे येथील कोव्हीड सेंटर आजपासून सुरू करण्यात येईल अशीही माहिती यावेळी सामंत यांनी दिली.