गुहागर – गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील व्यापार्यांनी प्राथमिक केंद्रामध्ये कोरोणा चाचणी केली. या चाचणीमध्ये सोळा दुकानदारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तातडीने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी तसेच व्यापारी संघटनेने घेतला .त्यापैकी सात व्यापाऱ्यांनी खात्रीसाठी वालावलकर रुग्णालय डेरवण येथे पुन्हा चाचणी केली.
आबलोली हे अनेक गावांचे सेंटर असल्याने या ठिकाणी तवसाळ,नरवण ,खोडदे, भातगाव ,मासू ,असोरे, आवरे या गावांच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी काही प्रमाणात बाजारपेठ तसेच शैक्षणिक दृष्ट्या नाव आहे .यामुळे येथे येथील परिसरातील लोक ये-जा करीत असतात याच बाजारपेठेमध्ये ही संभ्रमावस्था झाल्यामुळे परिसरामधील जनता द्विधा मनस्थितीत आहे .आबलोली येथील या सोळा व्यापाऱ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती .त्यामुळे त्यातील सात व्यापाऱ्यांनी वालावलकर रुग्णालय डेरवण येथे जाऊन पुन्हा आरटीपीसी आर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला .सातही व्यापाऱ्यांनी तपासण्या केल्या तेव्हा अहवाला अंती सातही व्यापारी कोरोना ग्रस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्यापारी कोरोना मुक्त की कोरोनाग्रस्त — सचिन बाईत.
सात व्यापारी कोरोना मुक्त की कोरोनाग्रस्त — सचिन बाईत. सात व्यापाऱ्यांचे शासकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह पण खाजगी रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आल्याने नक्की व्यापारी “कोरोणा मुक्त की कोरोणा ग्रस्त”हे कोण सांगणार, हे रिपोर्ट करावे की नाही याबाबत जनतेमधून ही द्विधा मनस्थिती झाली आहे .याबाबत शिवसेनेचे गुहागर तालुका प्रमुख सचिन शेठ बाईत यांनी नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांचे शासकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह पण खाजगी रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आल्याने नक्की व्यापारी “कोरोणा मुक्त की कोरोणा ग्रस्त”हे कोण सांगणार, हे रिपोर्ट करावे की नाही याबाबत जनतेमधून ही द्विधा मनस्थिती झाली आहे .याबाबत शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी नाराजी व्यक्त केली.