गुहागर – गुहागर पंचायत समिती सभापती निवड आज मंगळवारी झाली असून सभापती पदी शिवसेनेच्या सदस्या पूर्वी निमूणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज मंगळवारी पंचायत समिती सभागृहात सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी पूर्वी निंमुणकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी पूर्वी निमुंणकर यांची सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित केले.
त्यानंतर सभापती खुर्चीत त्यांना बसविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव ,माजी सभापती सुनील पवार, विभावरी मुळे, विनायक मुळे ,पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले,सिताराम ठोंबरे ,रवींद्र आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, तालुकाप्रमुख सचिन बाईत ,महिला तालुका संघटक पारिजात कांबळे, प्रदीप सुर्वे, विलास गुरव,भाऊ उकार्डे,संतोष नेटके, अाबलोली सरपंच तुकाराम पागडे, प्रकाश काताळकर, युवा सेना तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, सचिन जाधव, वनिता डीगणकर, निलेश मोरे ,प्रथमेश निमूणकर, प्रशांत विचारे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपविभागप्रमुख ,शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते .यावेळी प्रास्ताविकामध्ये बोलताना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी सांगितले की ,आमदार भास्कर जाधव यांनी पूर्वी निमुंणकर यांना सभा पदाची संधी दिल्याने आभार व्यक्त करून गुहागर मध्ये जास्तीत जास्त निधी कसा येईल ,तसेच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती निवडणुकांमध्ये गुहागरला परत संधी मिळाल्यास गुहागर चा विकास खऱ्या अर्थाने प्रगतीने होईल, तालुक्यातील जनतेने सुद्धा सभापतींना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. नूतन सभापती पूर्वी निंमुणकर यांनी सांगितले की, आमदार भास्कर जाधव व जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या आशीर्वादाने मला सभापतीपद मिळाले असून आमदार भास्कर जाधव साहेबांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरविला आहे, सर्वांच्या सहकार्याने गुहागर पंचायत समितीचा कारभार चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न माझा राहील.नूतन सभापती पूर्वी निमुणकर यांचा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, माजी सभापती सुनील पवार, विभावरी मुळे, तालुका प्रमुख सचिन बाईत,तसेच शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी सत्कार केला.