रत्नागिरी – आगामी शिमगोत्सव काळात जिल्हाधिकारी रत्नागिरी यानी कोविड – १९ चा प्रसार रोखण्यासाठी काही निर्बंध शिमगोत्सव काळात घातले आहेत परंतु हे निर्बंध अतिशय किचकट असुन याचा मुंबईकर चाकरमनी व गावकरी यांना शिमगोत्सव काळात नाहक मनस्ताप होवु शकतो व प्रशासन व नागरीक यांच्यात वादही होवु शकतात त्यामुळे अशा अटी व निर्बंध शिथिल करावेत यासाठी राजापुरचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेवुन जिल्हा प्रशासनाला सुचना केल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषद सीईओ इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. दरम्यान मुंबई पुणेकर चाकरमनी यांनी कोकणात येताना आपल्या आरोग्याची खबरदारी घ्यावी व आपल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंतीही आमदार राजन साळवी यांनी चाकरमन्यांना प्रसारमाध्यमांव्दारे केली आहे.