गुहागर – सध्या गुहागर-विजापूर महामार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम मनिषा कंस्ट्रक्शन या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. परंतू या कंपनीच्या गुहागर- चिपळूण महामार्गावर विविध गाड्यांवर जे स्थानिक चालक आहेत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे या चालकांच्या लक्षात आल्याने सुरूवातील सांगितल्या प्रमाणे पगार मिळत नसल्याने त्यांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारला असता या तरूण वाहनचालकांना कंपनीच्या प्रशासनाने चक्क कामावरून काढून टाकले असून त्यांच्याठिकाणी परप्रांतीयांची वर्णी लावण्यात आ आहे. त्यामुळे ते बडतर्फ चालक कमालीचे संतापले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे स्थानिक वाहनचालक पुढीलप्रमाणे दृ प्रमोद रसाळे (चिखली), नितीन गमरे (चिखली), अमित कदम (मुंढर), अविनाश शिर्के (मुंढर), सुनिल पवार (चिवेली), सुनिल लांजेकर (मुंढर), भरत चव्हाण (चिवेली) या चालकांना कंपनीने बडतर्फ केले. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक चालक व परप्रांतीय चालकांच्या पगारामध्ये तफावत ठेवली आहे. परप्रांतीयांना जास्त तर स्थानिकांना अल्प पगारात या कंपनीचे अधिकारी राबवून घेत असल्याची माहिती या वाहनचालकांनी दिली.
या कामी वापरण्यात येणाऱ्या काही गाड्या विना पासिंगच्या आहेत. जर यातायातीमध्ये अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? खरे तर स्थानिक चालकांना सुरूवातीला १७ हजार पगार सांगण्यात आला होता, परंतू प्रत्यक्षात मात्र त्यांना १५ हजारच पगार देण्यात यायचा. त्यामुळे या वाहनचालकांनी कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता चिडलेल्या अधिकाऱ्यांने त्यांनाच कामावरून काढून टाकल्याची माहिती या चालकांकडून मिळते. आता पुन्हा या कामगारांना कंपनी कामावर घेते की नाही हे पाहणे जरूरीचे. कारण चालक १७ हजारावर अडून बसलेले आहेत. मुळातच कामगार पुरवठा करणारे बरेच दलाल ही या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत.यामध्ये कंपनी व्यवस्थापन यांचा संपर्क होऊ शकला नाही.