चिपळूण ; मार्गताम्हाणे येथे हातभट्टी उध्वस्त उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांची कामगिरी

0
328
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे हातभट्टीवर येथील पोलिसांनी धाड टाकून १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल उध्वस्त केला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी १.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास म्हणजे तब्बल दोन तास करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी आपल्या पथकासह समवेत केली. यावरून चिपळूणात हातभट्ट्या धगधगत असल्याचे समोर आले आहे.

मार्गताम्हाणे येथील नदीकिनारी हातभट्ट्या धगधगत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांना मिळाली. यानंतर आपल्या पथकासमवेत मार्गताम्हाणे येथील नदीकिनारी हातभट्टीवर धाड टाकली. यावेळी दारू बनवण्यासाठी लागणारा गुळ, रसायन, कॅन, ड्रम व गावठी दारू असे साहित्य आढळून आले. सदरील साहित्य जागीच नष्ट केले. यावरून याठिकाणी हातभट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी प्रदीप चव्हाण ( रा. मार्गताम्हणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पोलिस धामापुरकर पोलीस नाईक इमरान शेख, श्री भोसले, श्री. कुळे, श्री. आदावडे, श्री. गुरव, श्री. तडवी, श्री. जानकर, श्री. शिवलकर, श्री. जाधव यांनी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here