खेड – खेड तालुक्यातील कुलवंडी येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारुन ३ लाख १७ हजार रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभटटी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी अवैध दारू विरोधात मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत सातत्याने उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील अनेक हातभटटयांवर छापे मारुन गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान कुलवंडी येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. यानुसार विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार, अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक खेड, भरारीपथक व चिपळुण विभागाचे कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी गावठी दारू व रसायन असा मिळून एकुण रू.३,१७,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याठिकाणी दारू निर्मितीसाठी लागणारे जवळपास १२७०० लिटर रसायन व तयार हातभटटीची दारू ७० लिटर मिळुन आली. सदरची कारवाई मा.उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक खेड, चिपळुण व भरारी पथक या कार्यालयातील निरीक्षक, उपनिरीक्षक व जवान यांनी मिळून केली आहे. सदर गुन्हयाच्या ठिकाणी कोणताही इसम आढळुन न आल्याने अज्ञात इसमांविरूद गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पद्धतीने गावठी दारू धंद्यावर कारवाया सुरु राहतील, असा इशारा उपअधीक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी दिला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास निरीक्षक खेड श्री. शंकर जाधव करीत आहे