खेड – मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणाऱ्या अपघातात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या रोज वाढत असते.याचा विचार करता “मृत्युंजय दूत” संकल्पनेचा शुभारंभ कशेडी घाट येथे खेडचे डॉक्टर उपेंद्र तलाठी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
१ मार्च २०२१ रोजी पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलिस विभाग प्रमुख डॉ.भूषणकुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार हायवे “हायवे मृत्युंजय दूत योजना” राज्यात राबविण्यात आली.याच अनुषंगाने मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी पोलीस मदत केंद्र येथे मृत्युंजय दूत म्हणून चार पथके सज्ज करण्यात आली असून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.हायवे मृत्युंजय देवदूत टीम भरणे नाका, हायवे मृत्युंजय देवदूत टीम कशेडी बंगला,हायवे मृत्युंजय देवदूत टीम पोलादपूर,हायवे मृत्युंजय देवदूत टीम पोलादपूर ट्रॉकर्स अशा चार टीम आहेत.
यावेळी डॉ. उपेंद्र तलाठी , पोलीस ठाण्याचे पीएसआय चांदने,कशेडी टेपचे सहाय्यक यशवंत बोरकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल सुर्वे आणि पोलीस कर्मचारी,पत्रकार धनराज गोपाळ (रायगड टाईम्स पोलादपूर), पत्रकार राजेंद्र चव्हाण(तरुण भारत-खेड), मदत ग्रुप खेड अध्यक्ष-प्रसाद गांधी उपस्थित होते..यावेळी अपघातग्रस्थांना तात्काळ मदत कशी करावी याबाबत माहिती आणि मार्गदर्शन डॉ.तलाठी यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. दरम्यान मृत्युंजय देवदूत टीम भरणे नाका येथे प्रसाद गांधी, शिवाजी यादव,रोहन ऐरणकर, रोहित ऐरणकर,सुदर्शन कदम, हृतिक कदम यांची नियुक्ती करण्यात आली.कशेडी बंगला येथे मुकुंद मोरे, सहदेव कदम, महेश रांगडे,प्रकाश मादगे,समीर मोरे यांचे पथक तैनात असणार आहे.