लक्ष्मीकांत घोणसेपाटील
9890693214
गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील नवतरुण युवकांसाठी शुंगारतळी येथे आजपासून गुहागर प्रीमियमलीग ही क्रिकेट स्पर्धा सुरू झाली ही स्पर्धा ही एक खेळाडूंनसाठी सुवर्णसंधी ठरते. या स्पर्धेसाठी तालुक्यातील खेडोपाड्यातील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. आणि तेवढ्याच जिद्दीने खेळत आहेत.
गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे. गावागावात ,वाडी-वाड्यात जवळपास ऑक्टोबर पासून संपूर्ण मे महिन्यापर्यंत अनेक प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. त्यासाठी गावातले स्थानिक तरुण, मुंबईचे तरुण असे एकत्र येऊन गावातील तरुणांमध्ये एकोपा निर्माण व्हावा खेळाची जिद्द निर्माण व्हावी आणि त्याच खेळाच्या बळावर त्यांनी भविष्यात आपला खेळ दाखवा व या उत्साहाने अनेक ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात तालुक्यातील नवतरुण खेळाडू एकत्र यावेत आणि या मधून एखादा खेळाडु हा जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर खेळता यावा यासाठी गुहागर तालुक्यातील काळसूर येथील आदर्श युवामंच यांनी या वर्षीपासून गुहागर प्रीमियमलीग स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला.
ही स्पर्धा आजपासून शृंगारतळी येथील भव्यदिव्य अशा मैदानावर सुरू झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास सोळा संघ सहभागी आहेत. आणि प्रत्येक संघ हा साखळी पद्धतीने खेळला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक संघाला जवळपास एक ठराविक रक्कम खर्च करण्याची मुभा आयोजकांनी दिली आहे. आणि टीम तयार करून मालकांनी खेळाडू लिलाव पद्धतीने खरेदी करायचे होते. लिलाव पद्धतीने खेळाडू खरेदी करून प्रथमच या स्पर्धा होत असल्याने या ठिकाणी आयपीएलच्या स्पर्धेप्रमाणे ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये खेळाडूंना लिलावाची बोली लावून संघात घेतले जाते तसाच प्रकार या ठिकाणी गुहागर प्रीमियमलीग मध्ये करण्यात आला यावेळी गुहागर तालुक्यातील सर्वच भागातून गावा-गावातून खेळाडूंना फॉर्म भरून सहभागी करण्यात आले. तसेच ऑनलाइन पद्धतीने सुध्दा फॉर्म भरून खेळाडू जमविण्यात आले आणि त्याच जमलेल्या खेळाडू मधून उत्तम खेळणारे 16 कप्तान तयार करण्यात आले. तसेच सोळा संघांमध्ये प्रत्येक खेळाडू हा लिलाव पद्धतीने खरेदी करण्यात आला. यानंतर प्रत्येक संघ मालकांनी या सोळा खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देऊन त्यांनाचा सराव करण्यात आला. आणि अशाप्रकारे आजपासून या सोळा संघांमध्ये गुहागर प्रीमियमलीगची स्पर्धा सुरू झाली.
पहिल्या दिवसापासूनच गुहागर प्रीमियमलीग या ठिकाणी कोरोनाची योग्य प्रकारे खबरदारी घेत शासनाचे नियम पूर्णपणे पाळत ही स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक नामवंत खेळाडू आणि ग्रामीण भागातील खेळाडू येणार असल्याने या स्पर्धेमध्ये कोण विजयी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गुहागर प्रीमियमलीग ही नुसती स्पर्धा नसून या स्पर्धेतून जे खेळाडू तालुकास्तरावर आपलं नेतृत्व आपली क्षमता सिद्ध करतील या खेळाडूंना भविष्यात जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर कसा खेळता येईल यासाठी सुद्धा आयोजक संधी उपलब्ध करून देणाऱ आहेत. त्यामुळे खरोखरच गुहागर प्रीमियमलीग ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. हे मात्र तेवढेच खरे