विनापरवाना सार्वजनिक कार्यक्रम करणार्‍यावर कारवाईचे आदेश तसेच शिमगा सण साधेपणाने साजरा करावा – उदय सामंत

0
610
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जे लोक सार्वजनिक कार्यक्रम विनापरवाना करतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश आपण दिले असल्याची माहिती तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली लग्नसमारंभ व हॉलच्या बाबतीतदेखील दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले काही दिवसांनी येणारा शिमगा सण हा कोकणचा आपला घरचा सण आहे मात्र सद्य परिस्थितीचा विचार करता हा सण साजरा करायचा आहे मात्र तो साधेपणाने साजरा करावा तसेच जिल्ह्यातील सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धा खो खो स्पर्धा स्नेहसंमेलन आदी गोष्टी काही काळाकरिता बंद कराव्यात असेही आवाहन सामंत यांनी केले आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here