सावधान ; एकाच गावात 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

0
910
बातम्या शेअर करा

खेड – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे संकट कमी होत असल्याचे चित्र असतानाच आज खेड तालुक्यातील वरवली गावातील धुपेवाडी एकाच दिवसात 27 जण पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खेड आरोग्य विभागाची टीम वरवली गावात दाखल झाळी असून आता या परिसरातील लोकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.दरम्यान गाव बाधित क्षेत्र घोषित करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

या गावातील धुपेवाडी येथे चार दिवसापूर्वी एका व्यक्तीची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील सत्तावीस लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमुने पॉझिटिव आले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाने दिल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी आपल्या टीमसह गावात पोहोचले असून पुन्हा एकदा सर्वत्र सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. याआधी खेड तालुक्यात कोरोनाने 55 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना आज अचानक एका गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here