रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला पाली येथे आज पहाटे एका मारुती झेन मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असताना रंगेहात पकडले.
पाली येथे एमएच -02 जेए 3749 ही मारुती झेन गाडी भरधाव वेगाने येत असलेली दिसून आली सदर वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचा मोठा साठा मिळून आला.यामध्ये वाहनासह 2,82,200/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात वाहनचालक वृषाल रामभाऊ चव्हाण रा. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. उपअधीक्षक व्ही व्ही वैद्य यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी धडक कारवाया केल्या आहेत.त्याच अनुषंगाने निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने वाहन तपासणी करत असताना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने पाली येथे सदर वाहन गोवा बनावटीच्या मद्यासह ताब्यात घेतले.यापुढेही गोवा बनावटीच्या मद्यविक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे उपअधीक्षक व्ही व्ही वैद्य यांनी सांगितले.सदर कारवाई मा विभागीय उपायुक्त वायएम पवार अधिक्षक डॉ बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअधीक्षक व्ही व्ही वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक शरद जाधव जवान ,विशाल विचारे, सागर पवार, निनाद सुर्वे, दत्तप्रसाद कालेलकर, सहकारी रोहन तोडकरी ,महेश पाटील यांनी केली.