गिमवी ग्रामपंचायत! वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला? फटका कुणाला ?चर्चेला वेग

0
561
बातम्या शेअर करा

गुहागर : गुहागर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकांपैकी गिमवी -देवघर या ग्रुप ग्रामपंचायतीत शिवसेना विरूध्द नाराज शिवसेना पुरस्कृत गावपॅनल अशी लढत होत असल्याने याठिकाणी पार पडलेल्या मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची प्रतिक्षा आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गिमवी- देवघर या ग्रुप ग्रामपंचायतीत गेली पाच वर्षे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य असून ही ग्रामपंचायत दोन गावांत विभागली गेली आहे. सध्या या ठिकाणी ९ जागांसाठी तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व २२ उमेदवार शिवसेना आणि फक्त शिवसेना या पक्षासी निगडीत असल्याने याठिकाणी होणारी निवडणूक ही शिवसेना विरूध्द शिवसेनेमध्ये नाराज असणारे ग्रामस्थ यांच्यामध्ये झाली त्यामुळे मतदानाची टक्केवारी ही वाढली असून वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला बसणार याची चर्चा संपूर्ण गिमवी -देवघर मध्ये सुरू आहे.गिमवीतील प्रभाग क्र. १ मध्ये ३ जागांसाठी एकूण ७ उमेदवार उभे आहेत. याठिकाणी शिवसेनेचे माजी उपसरपंच विजय जाधव गिमवी शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद सोमण किशोर जाधव ,माजी शाखाप्रमुख सतिश नार्वेकर यांच्यात तुल्यबळत लढत होत असल्याने याठिकाणी ७३.६९ टक्के मतदान झाले आहे. तर प्रभाग क्र. २/१ ६८.६३ तर याच प्रभागामध्ये विभागलेल्या देवघर गावात म्हणजेच २/२ ६१.३१ टक्के मतदान झाले आहे. तर प्रभाग क्र. ३ मध्ये जो संपूर्ण देवघर गाव यात समाविष्ट आहे त्यामध्ये ६९.२१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेल्या या मतदानाचा फटका नक्की कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार याचीच आकडेमोड सध्या गिमवी देवघर परिसरात सुरू आहे. मात्र असे असले तरी या ग्रामपंचायतीवर नक्की कोण विजयी होणार याचा निकाल मात्र मतमोजणीच्या दिवशीच कळेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here