चिपळूण – ( विशेषप्रतिनिधी )- चिपळूण तालुक्यातील पेढे – परशुराम ते फरशी तिठा दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम आणि मोबदलासदर्भात मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू आहे असे असतानाच परशुरामाच्या सरपंच आणि कोणालाही विश्वासात न घेता प्रशासनाला काम सुरू करण्याबाबतचे पत्र दिल्याने आणि कामाला सुरुवात झाल्याने पेढे व परशुराम ग्रामस्थ तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी कमालीचे आक्रमक झाले आहेत. या विरोधात त्यांनी नुकतेच चिपळूण पोलीस स्थानकात धडक देत चौपदरीकरणाचे काम तत्काळ थांबविण्याची मागणी केली. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास २६ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही एका निवेदनाद्वारे दिला आहे.
पेढे परशुराम येथील ग्रामस्थ देवस्थान आणि गावातील को यांच्यात महामार्गाच्या भूसंपादनातील बदलाबाबत तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे परशुराम घाट हे फरशी धर्मांचे चौधरी करण्याचे काम थांबले करत होते परंतु परशुराम येथील सरपंचाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी महामार्गाला प्रशासनास पत्र दिले त्यानुसार येथील ठेकेदार कंपनीकडून काम सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या दोन्ही गावातील ग्रामस्थ तसेच संघर्ष समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी पेढे येथील श्रीदेव धावजी मंदिराच्या सभागृहात तातडीची बैठक घेतली. या बैठकीला दोन्ही ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच सुमारे दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी सुरू असणाऱ्या कामाबाबत तसेच परशुराम गावच्या सरपंच यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. परशुरामांच्या सरपंचांनी कोणालाही विश्वासात घेतले नसल्याचा आरोप या बैठकीत केला. त्यामुळे हे काम तातडीने थांबविण्यात यावे असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
या बैठकीनंतर सर्वांनी थेट चिपळूण पोलिस स्थानक गाठत पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय जरी महत्वपूर्ण असला तरी मोबदल्याचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाही त्याची चर्चा मंत्रालय स्तरावर सुरू आहे. तोपर्यंत भूसंपादनाच्या मोबदल्याचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम सुरू करू नये अशी मागणी पेढे परशुराम गावातील ग्रामस्थांनी तसेच संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली. ठेकेदार कंपनीने या विनंतीचा विचार न करता काम सुरू केल्यास २६ जानेवारीला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर पेढे सरपंच प्रवीण पाकळे, उपसरपंच प्रज्ञा काजवे, ग्रामपंचायत सदस्य अनंत गोखले, नामदेव बांद्रे, निलेश माळी, प्रकाश काजवे, चंद्रकांत रेपाळ, दीपक मोरे, विष्णू पडवेकर, सुरेश बहुतुले, मोहन शिंदे, गजानन भोसले, सुधीर गमरे, राजेंद्रखळे, राजेंद्र धाडवे, विश्वास सुर्वे, राकेश गमरे, दत्तात्रय मांडवकर, राजाराम गमरे, सुरेश गमरे, विद्याधर गमरे,संदेश माळी आदींची नावे आहेत.