खेड : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचे रूटमार्च

0
116
बातम्या शेअर करा


खेड – १५ जुलै रोजी होत असलेल्या ग्रामपंचात निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आज खेड पोलिसांनी खेड शहर वलगतच्या गावांमध्ये रुटमार्च काढला. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या स्टमार्चमध्ये ३ पोलीस अधिकारी, ३२ खेड पोलीस स्थानकाचे कर्मचारी तसेच २२ आरसीएफ जवान सहभागी झाले होते.
१५ जानेवारी रोजी तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यापैकी २३
ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तर ६४ ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. या दरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी आज रुटमार्च केले. या निवडणुकांदरम्यान चिंचघर, भडगाव, भरणे, आवाशी, लोटे या ग्रामपंचायती राजकिवदृष्ट्या संवेदनशिल मानल्या जातात. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आज दस्तुरी, चिचघर, खेड शहर, भरणे आणि आवाशी या ठिकाणी रुटमार्च केले.
निवडणुक हे लोकशाहीचा एक अविभाज्य भाग आहे. जनतेला आपला लोकप्रतिनिधी ठरविण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे निवडणुकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी प्रत्येकांन घ्यावी असे आवाहन खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here