मनसेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर चिखले यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

0
290
बातम्या शेअर करा

खेड – ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार ऐन रंगांत आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपनगराध्यक्ष आणि मनसेचे जेष्ठ पदाधिकारी किशोर उर्फ अप्पा चिखले यांनी त्यांचे सुपुत्र कौशल चिखले, कुंतल चिखले यांच्यासह समर्थकांना घेऊन शिवसेनेचा भगवा खान्द्यावर घेतल्याने खेडमध्ये मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.
शिवसेना नेते व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या जामगे निवास्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी दापोली मतदार संघाचे आमदार आमदार योगेश कदम यांनी किशोर चिखले व त्यांच्या समर्थकांचे शिवसेनेत स्वागत केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून किशोर चिखले मनसेचे निष्ठावंत मनसैनिक म्हणून काम करत होते. नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद भूषविलेले किशोर चिकले यांचे चिरंजीव कौशल आणि कुंतल हे देखील मनसेचे निष्ठावन्त कार्यकतें होते. आज सकाळी चिखले यांनी आपल्या समर्थकांसह जामगे येथील निवास्थानी शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
किशोर चिखले व त्यांच्या समर्थकांमुळे खेडमध्ये मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.
या वेळी जिल्हापरिषद सदस्य अरुण कदम, शहर प्रमुख निकेतन पाटणे , सभापती विजय कदम, नगरपालिका गटनेते प्रज्योत तोडकरी ,नागेश तोडकरी , नगरसेविका सीमा वंडकर, रेशम पाटणे , कुंदन सातपुते , प्रसाद पाटणे, संजय मोदी , प्रसाद गांधी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन शेकडो जण शिवसेनेत दाखल होत असून , एका पाठोपाठ एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सेनेत दाखल होत असल्याने मनसेला धक्के बसू लागले आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here