रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील धवल कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीला धारधार हत्याराने भोसकले. महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पत्नी आसावरी देसाई ही माहेरी राहते. तिचा पती महाड एमआयडीसी येथे कामाला असून तो नाचणे येथे वास्तव्याला असतो. काही दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. सोमवारी सायंकाळी पत्नीला भेटण्यासाठी तो धवल कॉम्प्लेक्स येथे गेला होता. पत्नी बाजारात गेली असल्याने तो तिची वाट पाहात बिल्डिंग खाली उभा होता. पत्नी बाजारातून परतल्यानंतर त्या दोघांमध्ये बिल्डिंग खाली जोरदार वाद झाले आणि या वादातून पतीने पत्नीला धारदार हत्याराने भोसकले. यात आसावरी ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.