गुहागर -( मंगेश तावडे ) : रत्नागिरी जिल्ह्यातील शांतप्रिय असा ओळखला जाणारा गुहागर हा तालुका मात्र याच गुहागर तालुक्यात सध्या एका बुरसटलेल्या विचारसरणीच्या व्यक्तीने प्रशासनासह सर्वच व्यावसायिकांना आणि धंदेवाल्यांना जेरीस आणल्याने भीक नको पण कुत्र आवर असं म्हणण्याची वेळ सध्या गुहागर वासियांवर आली आहे.
शांतप्रिय अशा या गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. ही विकासकामे सुरू असताना अनेकांनी आपल्या गावचा शहराचा विकास व्हावा यासाठी आमदार खासदार मुख्यमंत्री निधी जिल्हा परिषद निधी या ठिकाणीहून निधी आणून विकासकामांना सुरूवात केली आहे. सर्वत्र काही अलबेल असताना तालुक्यातील शृंगारतळी येथील एक युवक मात्र प्रशासनाच्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी देणे, चाललेल्या विकास कामांवर माहितीचे अधिकारी टाकून माहिती मागविणे मात्र प्रत्यक्षात माहिती अधिकारात मागितलेली माहिती एकदाही न घेणारा असा हा युवक सगळ्यांचीच डोकेदुखी ठरला आहे. तालुक्यातील विकासकामांना जाणूनबुजून अडथळा करणे, तालुक्यातील ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक यांच्या विरोधात अर्ज करून त्यांच्याकडून चिरीमीरीची अपेक्षा करणे हाच एकमेव उद्देश असल्याने “पैसे कमवण्याचा वेद लागलेला हा वेळ’कर” सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. या आधीही शृंगारतळीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्र येत या तरूणाविषयी तहसिलदार, जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज केलेत मात्र असे असले तरी हा तरूण अद्यापही तालुक्यात होत असलेल्या विकास कामांना जाणूनबुजून अडथळा निर्माण होत असून तुम्ही मला चिरीमीरी द्या मी तुम्हाला अडचण करणार नाही असे सांगत असल्याने आता या युवकाचे करायचे काय असा प्रश्न सध्या सर्वसामान्य व्यक्तींसह प्रशासनातील अधिकारी वर्गाला पडला आहे.
शृंगारतळीतील हाच तो चिरीमीरी गोळा करण्यासाठी माहिती अधिकाराचा दुरूपयोग करणारा व “पैसे कमवण्याचा वेद लागलेला हा वेळ’कर” सध्या गुहागर तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांचे बोगस नाव वापरून अनेकांना धमकावत असल्याचे सुध्दा पुढे आले आहे. या युवकांनी जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला फोन केला तर त्या अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवर ट्रूकॉलरद्वारे गुहागरचे पोलीस निरीक्षक यांचे नाव येत असल्याने समोरील व्यकती घाबरत असून त्या युवकाच्या मागणीला बळी पडत असल्याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे.