खेड – कोकण मार्गावरील खेड तालुक्यातील वार्वेतर्फे नातू या गावाजवळ कोकण रेल्वेची देखभाल दुरूस्ती (युटीव्ही) मशिनचे पुढील २ चाक रूळावरून निखळल्याची घटना घडली त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
आज सकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोकण मार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने या मार्गावरील नेत्रावती व मंगला एक्सप्रेसला रत्नागिरीत तर मांडवी एक्सप्रेस रोहा स्थानकात थांबवण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. दोन क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या असून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रूळावरील जॉईंट सुटल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.