गुहागर – (विशेष प्रतिनिधी ) गुहागर तालुक्यात विहीर चोरीला गेल्याची घटना माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. वेळंब गावातील घाडेवाडीमधील सर्व्हेनंबर १०९० च्या जमिनीत जलसिंचन योजनेंतर्गत २००२ साली विहीर मंजूर झाली. २००४ साली विहीर पूर्ण होवून कगदोपत्री अनुदान देखील काढण्यात आलं मात्र कागदोपत्री बांधलेली विहीर जागेवरून मात्र गायब झाली आहे. विशेष म्हणजे विहीर पूर्ण झाल्याचा सातबा-यावर शेरा देखील मारण्यात आलाय विहीर खोदाईचे तब्बल ३८ हजारांचं अनुदान देखील संबंधितांन देण्यात आलंय. मात्र प्रत्यक्षात त्या जागेवर त्यांनी विहीर न खोदताच त्या विहिरीचे मंजूर अनुदान लाटल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारामध्ये आता पुढे आला आहे.
जागेवर विहीरच नसल्याने ज्यांनी शासनाला फसवले आहे त्या व्यकतीवर कारवाई करावी अशी मागणी तुकाराम बारगोडे यांनी केली आहे. मात्र घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यास मात्र ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व गुहागर पंचायत समितीकडून टाळाटाळ होत आहे.