गुहागर – आजच्या आधुनिक युगात सर्वच व्यक्तींकडे अत्याधुनिक मोबाईल आले आहेत. याच मोबाईलचा उपयोग करत अनेक जण आपल्या आठवणींसाठी अनेक ठिकाणची सेल्फी काढत असतात. त्याचवेळी गुहागरच्या बस स्थानकावर जर एखादा प्रवासी जर आला तर त्याला आठवण म्हणून इथली सेल्फी काढता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुहागर आगार येथे प्रवाशांना आणि पर्यटकांना एसटी. बसकडे आकर्षीत करण्यासाठी खास सेल्फी पॉईंटची सोय करण्यात आली असून सेल्फी काढण्यासाठी प्रवाशी आणि पर्यटकांची गर्दी होत आहे.
हा आकर्षक सेल्फी पॉईंट बनवीण्यासाठी गुहागर आगार मधील कर्मचारी एस. आर. जाधव, ए. डी. काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कामी गुहागर आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण यांचेसह सर्व अधिकारी, कार्यशाळेतील अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. या सेल्फी पॉइंट मुळे गुहागर चे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि त्या मानाने का होईना प्रवासी पुन्हा एकदा एसटीच्या प्रवासाकडे वळेल. या उपक्रमाचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी कौतुक केले आहे.य
















