चिपळूण – (विशेष प्रतिनिधी ) -चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास जलद लावल्याने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व त्यांच्या सहकारी वर्गाला नुकतेच पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड देण्यात आले. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
चिपळूण शहरातील बावशेवाडी येथे नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या मृतदेह आढळून आला होता. या ठिकाणी काही मुलांना ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. सावंत यांच्या डोक्यात दगडाने मारल्याचा खुणा आढळून आल्या होत्या. मात्र हा खून कोणी व का केला याचा तपास चिपळूणचे पोलीस जवळपास तीन महिने करत होते. मात्र या प्रकरणाचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. मात्र त्याच वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांची चिपळूण येथे बदली झाली होती.ते अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रसिद्ध आहेत.त्यामुळे त्यांच्याकडून हे खून प्रकरणही लवकर उघडकीस आणला जाईल अशी अपेक्षा बाळगली जात होती. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या कौशल्याने अवघ्या काही दिवसातच त्या खून प्रकरणाचा छडा लावला आणि त्या वेळेला हा जो खून झाला होता तो कशा प्रकारे झाला तो शोधून काढले त्या वेळेला मात्र चिपळूण करांनमधून त्या खुनी व्यक्ती बद्दल संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. हा खून एका बावीस वर्षे मुलांनी केल्याचे उघड झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न घेऊन काही दिवसातच या खून प्रकरणाचा छडा लावला होता. त्यामुळे सर्वस्तरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होतं होत. सुरज गुरव आणि त्यांच्या सहकारी वर्गाच्या कार्याची दखल घेत नुकतच त्यांना पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड जाहीर करण्यात आल मुंबई येथील एका कार्यक्रमात त्यांना हे पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड देण्यात आले. यानंतर आपल्या कामाची दखल घेतल्यामुळे आपण खूश आहोत यापुढे आपण अशाच प्रकारे काम करू अशी प्रतिक्रिया सध्या पुणे येथे कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी प्रगती टाइम्सशी बोलताना सांगितले. सुरज गुरव यांच्यासोबत त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, योगेश नार्वेकर, पंकज पडेलकर यांना ही पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवार्ड देण्यात आले आहे.
