शिरगाव ( ता चिपळूण ) :युवक राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित पोफळी पंचायत समिती गण मर्यादित कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, आणि या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार श्री. शेखरजी निकम सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोफळी ग्रामपंचायत येथे पार पडला.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक साईदीप विजय कदम, द्वितीय क्रमांक जागृती संतोष सरफरे, तृतीय क्रमांक शर्वरी सुभाष मोरे व उत्तेजनार्थ रुद्रतेज राजेंद्र कोलगे यांना त्यांच्या गुणवत्तेत भर पडण्यासाठी छान पुस्तके व सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र आमदार शेखरजी निकम सर, चिपळूण संगमेश्वर क्षेत्राध्यक्ष श्री. दादासाहेब साळवी, चिपळूण युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील शिंदे व पोफळी गावच्या सरपंच तेजस्विनी मानकर तसेच उपसरपंच श्री. अब्दुल्ला भाई सय्यद यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
मुलांनी अशा निरनिराळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले बौद्धिक कौशल्य वापरले पाहिजे तसेच मुलांना स्टेज डेरींग येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी वक्तृत्व स्पर्धा घ्याव्या असे आमदार निकम सर यांनी सुचविले व युवकांना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धकांनी कंदिल पर्यावरण पूरक व पारंपरिक पद्धतीने बनविले असल्याने पं. स. सदस्य बाबूशेठ साळवी यांनी स्पर्धकांचे कौतुक केले.
सदर स्पर्धेमध्ये पोफळी, शिरगाव, कुंभार्ली व कोंडफणसवणे या चारही गावातील सुमारे 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोरोना सारख्या महामारीमुळे ही कंदिल स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली होती व यापुढेही राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते मुलांच्या बुध्दीला चालना देणारे उपक्रम घेतील असे प्रस्तावित मध्ये पोफळी पंचायत समिती गणाचे युवक अध्यक्ष किशोर मानकर यांनी सांगितले.
या बक्षीस वितरण सोहळ्याला रमेश राणे, जयंत शिंदे, निलेश कोलगे, भरत कदम, इब्राहिम सय्यद, श्रीधर शिंदे, गोपीचंद मानकर, विजय कदम असे अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धकांनमधून कु. शर्वरी मोरे व युवकांनकडून कु. प्रितेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले व या रंगतदार कंदिल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन तसेच युवकांना वारंवार प्रोत्साहन देणारे प्रदीप पवार सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, स्पर्धक, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक किशोर मानकर यांनी मानले.