चिपळुणातील ३ युवकांचे यश ,बीआरएम सायकलिंग स्पर्धेत 200 किलोमीटर अंतर १३ तास ३० मिनिटात केले पार

0
181
बातम्या शेअर करा

चिपळूण- मागील आठवड्यात चिपळुणातील चिपळूण सायकलिंग क्लबच्या विक्रांत सुनील आलेकर (सती – समर्थनगर), प्रसाद दीपक आलेकर (खेंड वसाहत), मुकुल संजय सोमण (बापट आळी) या तीन तरुणांनी प्रथमच २०० किलोमीटरच्या BRM (Brevets de Randonneurs) सायकलिंग इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवून दिलेले अंतर सायकलवरून १३ तास ३० मिनिट या वेळेच्या आत पूर्ण केले व चिपळूण शहाराचे नाव जिल्ह्याबाहेर नोंदवून चिपळूणकरांची दखल इतरांना घ्यायला भाग पाडले आहे.
यामध्ये त्यांना प्रामुख्याने श्रीनिवास गोखले ,स्वप्नील दाभोळकर यांचे मार्गदर्शन तसेच सर्व चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांचा पाठींबा लाभला.

BRM सायकलिंग इव्हेंट हा सायकलिंग क्षेत्रातील खूप जुना व प्रचलित इव्हेंट आहे ज्याची सुरवात सुमारे १२३ वर्षांपूर्वी (१८९७) इटली या शहारापासून झाली जो अविरतपणे आजतागायत निरंतर चालू आहे. या इव्हेंटची सुरवात भारतामध्ये २०११ या वर्षांपासून झाली. ज्याची कमान दिव्या ताटे (पुणे) या महिलेने सांभाळली होती. जे की आता भारतामध्ये जवळपास सर्व मोठ्या शहरामध्ये तेथील सायकलिंग क्लब (ज्यांना AUDAX Club Parisien – France ची मान्यता आहे) भरवत असतात. या इव्हेंट मध्ये तुम्हाला एक दिलेले निश्चित अंतर सायकल वरून दिलेल्या विशिष्ट वेळेत पूर्ण करावे लागते. २०० किलोमीटर १३.५ तासात, ३०० किलोमीटर २० तासात, ४०० किलोमीटर २७ तासात, ६०० किलोमीटर ४० तासात. वरील चारही इव्हेंटजो कुणी सायकलिस्ट एका कॅलेंडर वर्षात पूर्ण करेल त्याला SR( Super Randonneur) हा मानाचा किताब मिळतो. सदर सायकलिस्ट फ्रान्स या देशात होणाऱ्या PBP (Paris Brevet Paris Randonneurs) १२३० किलोमीटर ९० तासात पूर्ण करायच्या इव्हेंटसाठी पात्र म्हणून समजला जातो.

चिपळूण शहरातील या ३ तरुणांनी BRM या इव्हेंटमध्ये पुणे व मुंबई या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवून ते पूर्णही केले, आता त्यांचं पुढील लक्ष हे ३००/४००/६०० किलोमीटरच्या इव्हेंटकडे आहे. त्यासाठी हे नियमित सायकलिंगचा सराव करताना आपल्याला चिपळूण शहराच्या आसपास दिसत राहतात.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here